मिमी…थोडी फिल्मीच!
नुकताच MIMI हा चित्रपट पाहिला, ज्याची शिफारस माझ्या एका मैत्रिणीने केली होती. काही चांगले लोक, काही वाईट लोक पण अपेक्षेनुसार आनंदी शेवट! मानवी भावनांचा वेध घेणारा एक साधा सोपा चित्रपट!
सरोगेट मातेच्या भावना क्रिती सनोनने सुंदरपणे व्यक्त केल्या आहेत. केवळ पैसे मिळवण्याच्या भावनेतून सरोगसीसाठी तयार होणाऱ्या सरोगेट मातेचा नंतर \’ आई \’ होण्यापर्यंतचा प्रवास कित्येक अनपेक्षित आणि काही दुर्दैवी घटनाक्रमातून उलगडत जातो. अर्थात येथे चित्रपटाची कथा सांगून मला तुमची उत्सुकता संपवायची नाहीये. पंकज त्रिपाठी यांनीही नेहमीप्रमाणेच आपले काम चोख केले आहे.
आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी, डोनर स्पर्म ई. असे विषय आहेत की जे महिलांना नेहमीच भावतात. याबद्दल जाणून घेण्याची त्यांना तीव्र उत्सुकता असते. म्हणूनच या विषयांचा वापर अनेक दिग्दर्शकांनी केला आहे आणि आपण यावर आधारित गुड न्यूज, विकी डोनर, चोरी चोरी चुपके चुपके इत्यादी चित्रपट पाहिले आहेत.
डॉक्टर प्रत्यक्षात हॉस्पिटल मध्ये ज्या पद्धतीने आय व्ही एफ अथवा सरोगसी प्रक्रिया राबवतात त्याच्याशी फारकत घेऊन दिग्दर्शक चित्रपटातून कित्येक साऱ्या सरसकट चुकीच्या गोष्टी दाखवून जनमानसात अनेक गैरसमज निर्माण करतात. सिनेमॅटिक लिबर्टी करमणुकीच्या दृष्टीने आवश्यक असली तरी प्रत्यक्षात काय घडते हे आपणास सांगावे म्हणून हा लेख !
कायद्यानुसार भारतात सध्या परदेशी नागरिकांसाठी सरोगसीवर संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अमेरिकन महिलेसाठी कुणी सरोगेट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
भारतीय कायद्यानुसार सरोगेट ही नेहमीच एक विवाहित स्त्री असते, जिला स्वतःचे किमान एक मूल आहे, म्हणून अविवाहित स्त्रिया कधीही चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सरोगेट होऊच शकत नाहीत.
सरोगसी प्रक्रिया करून घेण्याची गरज कोणाला पडू शकते ?
१) जेव्हा एखाद्या आजारामुळे एखाद्या स्त्रीला बाळंतपण जीवघेणे ठरू शकत असल्यास,
किंवा
२) जन्मतःच गर्भाशय नाही अशा स्त्रिया किंवा शस्त्रक्रियेने गर्भाशय काढले गेलेल्या स्त्रिया
किंवा
३)जिच्या गर्भाशयात दोष असल्यामुळे ती गर्भधारणा करवून घेऊ शकत नाही अशी स्त्री
प्रथम, आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की आयव्हीएफ लॅबमध्ये गर्भ (embryo) किंवा भावी बाळ कसे बनवले जाते. यासाठी आपल्याला स्त्रीबीज (अंडे ovum) आणि पुरुष बीज (शुक्राणू sperm) या दोन गोष्टी आवश्यक आहेत.
ओव्हम पिकअप या भूली खाली केल्या जाणाऱ्या एका छोट्याशा शस्त्रक्रियेद्वारे स्त्री बीज मिळवले जाते. स्त्रीबीजे निर्मितीसाठी
स्त्रीला हार्मोनल इंजेक्शन्स घ्यावी लागतात आणि सुमारे 10 दिवस सिरियल सोनोग्राफीही करावी लागते. पतीच्या शुक्राणूंना वीर्य नमुन्यापासून वेगळे केले जाते, जे अत्यंत काळजीपूर्वक लेबल केले जाते (व्यक्तिश: आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने) आणि नंतर एका अंड्यात फक्त एक शुक्राणू इंजेक्ट केला जातो. यथावकाश ही अंडी नंतर इनक्यूबेटरमध्ये वाढवून गर्भ/embryo बनतात.
सामान्यतः सरोगसी या प्रक्रियेबद्दल रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या मनात कित्येक सार्या शंका / गैरसमज आणि अकारण भीती असते असे मी आत्तापर्यंत अनुभवले आहे.
सर्वात सामान्य गैरसमज असा आहे की पतीच्या शुक्राणूंना थेट सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडले जाते (MIMI चित्रपटात दाखविल्याप्रमाणे). परंतु असे कधीही केले जात नाही.
आयव्हीएफ लॅबमध्ये योग्य प्रक्रिया राबवताना सरोगेट माता ही होणाऱ्या बाळाची जैविक आई असूच शकत नाही. म्हणजेच,सरोगेट मातेची अंडी भ्रूण तयार करण्यासाठी कधीही वापरली जात नाहीत.
सरोगेट माता फक्त आपले गर्भाशय बाळ वाढविण्यासाठी वापरण्यास परवानगी देते.
सरोगसी प्रक्रिया कशी केली जाते?
सरोगसीसाठी गर्भ (embryo) खाली नमूद केलेल्या मार्गांनी बनवला जातो:
१) सरोगसी करवून घेऊन आई बनण्याची इच्छा बाळगणारी स्त्री (इच्छुक माता – intending mother) स्वतः आयव्हीएफ प्रक्रियेतून जाते, ज्यामध्ये तिची अंडी/ स्त्रीबीजे शस्त्रक्रियेद्वारे प्राप्त केली जातात. नंतर ही अंडी तिच्या पतीच्या (इच्छुक पिता- intending father) शुक्राणूंचा वापर करून आयव्हीएफ लॅबमध्ये फलित करून गर्भ तयार केले जातात आणि अशा प्रकारे तयार झालेला गर्भ शेवटी सरोगेटच्या गर्भाशयात हस्तांतरित केला जातो.
किंवा
२) जर इच्छुक आई स्वतः अंडी तयार करण्यास असमर्थ असेल, तर एक स्त्रीबीज -दाता स्त्री (डोनर) अंडी दान करण्यासाठी निवडली जाते. डोनरची ओळख गोपनीयता राखण्यासाठी, इच्छुक माता किंवा पित्यास कधीही प्रकट केली जात नाही.
यातही डोनरला स्त्रीला हार्मोन्सची इंजेक्शने घेऊन तिची स्त्रीबीजे छोट्याशा शस्त्रक्रियेद्वारे शरीरातून प्राप्त केली जातात व नंतर इच्छुक पित्याच्या (intending Father) शुक्राणू सोबत त्यांचे प्रयोगशाळेत फलन केले जाते. यातून तयार होणारा गर्भ नंतर सरोगेटच्या मातेच्या गर्भाशयात छोट्याशा शस्त्रक्रियेद्वारे हस्तांतरित केला जातो. तो तिथे गर्भारपणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत वाढून शेवटी बाळ तयार होते. अशा वेळी, मग या प्रकरणात जन्माला येणाऱ्या बाळाला तीन माता असतात…अंडी दान करणारी जैविक माता, गर्भ वाढवून नंतर जन्म देणारी सरोगेट माता आणि बाळाला स्वीकारणारी आणि संगोपन करणारी इच्छुक माता ! अर्थात प्रचलित कायद्यानुसार इच्छुक माता हीच बाळाची आई असते.
बाळ जन्माला आल्यावर काय होते?
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्वरित सरोगेट माता बाळ इच्छुक मातेच्या हाती सुपूर्द करते. ती जन्मानंतर बाळाला स्तनपानही करत नाही.
सुदैवाने, उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करून, आता आपण इच्छुक मातेच्या शरीरात (तिची प्रत्यक्ष प्रसूती झालेली नसूनही) दूधनिर्मिती करू शकतो. ती बाळाला स्तनपानही देऊ शकते! हे दुग्धपान औषधांच्या मदतीने आणि इलेक्ट्रॉनिक पंपाद्वारे प्रेरित केले जाते. आपल्या बाळाचे दुग्धपान स्वतः केल्यामुळे इच्छुक मातेचा आत्मविश्वास वाढवण्यास खूपच मदत मिळते . जरी तिने तिच्या बाळाला जन्म देण्यासाठी दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयाची मदत घेतली असली तरी प्रत्यक्ष बाळाचा जन्म झाल्यानंतर तीच बाळाची आई असते आणि स्वतः बाळाला दूध पाजू शकण्याचे सूख ती अनुभवू शकते
हे सर्व वाचल्यावर आपल्या लक्षात आलेच असेल की काही बाळांना या जगात जन्म देण्यासाठी एकापेक्षा अधिक माता या प्रक्रियेत आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून, आपले योगदान देतात
एकंदरीतच, सरोगसी ही प्रक्रिया खरेतर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मूल होण्यास मदत करण्याचा एक उदात्त मार्ग आहे!!
डॉ. वैशाली चौधरी.
एम.डी.(स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र),
पी. एच. डी (वंध्यत्वचिकित्सा)
फोन : 9822311224
Mimi…Thodee Filmich
Just Happened to see the movie MIMI which was recommended to me by my friend. It was a nice watch, a simple movie full of emotions, good people, not-so-good people, and a happy ending.
The feelings of the surrogate mother are beautifully portrayed by Kriti Sanon, who goes through the process of Surrogacy with the sheer desire for monetary returns and the unfortunate things that lead to the future events in the movie. (I don’t want this to be a spoiler, so will not reveal the story). Pankaj Tripathi also did his job so well.
IVF, Surrogacy, Donor sperms, etc. are topics that can appeal emotionally and generate a lot of interest, especially in women. These Topics have been used by many directors and we have seen movies like Good News, Vicky Donor, Chori Chori Chupke Chupke, etc. on these themes.
Unfortunately, all these movies show many technical faults about how the techniques of these IVF procedures are done in the actual world.
First, we need to understand how an embryo or the future baby is made in the IVF lab. We need an egg that can be obtained by a surgical procedure of Ovum Pickup which is done under short general anesthesia and eggs are harvested. For this, the woman has to take hormonal injections and undergo serial sonographies for about 10 days the husband’s sperm are separated from the semen sample, which is very carefully labeled and witnessed manually and electronically, and then one sperm is injected into one egg. These eggs are then grown in incubators to grow into embryos
I have seen in my practice, couples and their relatives coming with many doubts in their minds about surrogacy.
The commonest myth and belief is that the husband’s sperm will be directly injected into the surrogate’s uterus, which was also implied in the movie MIMI. But this traditional surrogacy is never done in our IVF labs, as the surrogate mother cannot be the biological mother, which means that the surrogate’s eggs will never be used for making the embryo. The surrogate will only grow the formed embryo in her uterus.
How is the process of surrogacy done?
An embryo for surrogacy is made in one of the ways mentioned below:
- The intending Mother ( the woman who wants to employ a surrogate ) undergoes the process of IVF, in which her eggs are retrieved by a surgical procedure and are fertilized in the IVF lab using her husband’s (The Intending Father’s) sperm and the embryo that is formed is then transferred into the surrogate’s uterus or
- If the Intending Mother is unable to produce eggs herself, then a donor female is chosen to donate eggs. The identity of the donor is never revealed to the intending Mother and Intending Father, to keep the privacy. The Donor woman will undergo the procedure of taking Hormonal injections and then her eggs are retrieved by a surgical minor procedure and these eggs are fertilized in the IVF Lab with the Intending Father\’s sperms and the embryo will be transferred to the surrogate’s uterus. In this case, the baby that is born will have three mothers… the Biological Mother who donates the eggs, the Birth Mother who is the surrogate who gives birth, and the Intending Mother who accepts the baby and rears it.
Surrogacy has been banned for foreign nationals in India as of now, so there is no question of being a surrogate for an American woman as shown in the movie.
A surrogate is always a married woman who has at least one child of her own, so unmarried women can never be surrogates.
What happens when the baby is born?
The surrogate hands over the baby immediately after birth and she does not even breastfeed the baby after birth, but we have successfully induced milk production in the intending mother who has not given birth but still can breastfeed the baby. This lactation is induced with the help of drugs and pumping of the breasts with electronic pumps. This induced lactation helps tremendously to boost the confidence of the intending mother who has taken the help of another woman to give birth to her baby and increases the bond with her baby.
An intended Mother will opt for Surrogacy if giving birth can be life-threatening for her or she has no uterus either by birth or it has been removed surgically or her uterus is defective and cannot hold a pregnancy.
Some special babies need the technique of IVF and the efforts of more than one woman to bring them into this world.
A woman helping another woman in a noble way!!
– Dr. Vaishali Chaudhari,
M.D (Obs & Gyn), Ph.D (Infertility)
Phone: 9822311224