काही दिवसांपूर्वी मी माझ्या 22 वर्षाच्या मुलासोबत चर्चा करत असताना त्याला म्हणाले, \” आज दवाखान्याच्या पायऱ्या चढताना एका आजोबांच्या कडेवर असलेलं एक हसरं लहान बाळ बघून सहजच माझ्या मनात विचार येऊन गेला की अरे, मला सुद्धा अजून काही वर्षांनी अस नातवंड होण्याची वेळ आलीय की ! यावर तो मला हसतच म्हणाला, \”अग आई, अशी दिवास्वप्ने बघणे बंद कर. कारण मला मूल होणार नाहीये हे नक्की !\” आश्चर्यचकित होऊन मी त्याला विचारले, \”अरे बाबा, असे का म्हणतोस ?
त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून मी विचारात पडले. तो म्हणाला \”अगं आई, माझे लग्न होऊन, मूल होईपर्यंत उजाडेल 2032 वर्ष आणि माझं मूल 25 वर्षाचं होईपर्यंत उजाडेल 2057 वर्ष. तोपर्यंत ह्या पृथ्वीवर जिवंत राहण्यासाठी किती कठीण परिस्थतीतून जावं लागणार आहे ह्याचा अंदाज आहे का तुला ?\”
त्याच्या म्हणण्या नुसार जगाची लोकसंख्या अगोदरच प्रचंड वाढली आहे, पर्यावरणाचा र्हास होतोय, धर्म-जात-प्रदेश यावरुन कुठे ना कुठे नेहमी संघर्ष सुरू असतो. थोडक्यात – जग आता आहे, त्यापेक्षा भविष्यात ते अधिक वाईट असण्याचीच शक्यता जास्त आहे. मग अशा संघर्षमय जगात एक अपत्य का आणून सोडायचे ? आणि तेही आपल्या स्वार्थासाठी व त्याने ईच्छा व्यक्त केलेली नसताना ?
आता समजूत काढण्याची वेळ माझी होती. मी त्याला म्हणाले, मित्रा अपत्य निर्मिती ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे. गेली पंचवीस वर्ष वंध्यत्व चिकित्सक व स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करताना मी कितीतरी जोडप्यांना यासाठी मदत केली आहे. मूल झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. तुला सुद्धा ही गोष्ट अजून काही वर्षांनी कळेलच. ही नकारात्मकता तुझ्या विचारात कदाचित खूप सारे scifi अमेरिकन चित्रपट बघून आली असावी ज्यात जगाचा अंत जवळ आलेला असतो आणि कुणीतरी एक हिरो अचाट कृत्य करून ते थांबवतो.
पण प्रत्यक्षात असे खरच असते का? नैसर्गिक आपत्ती , युद्ध, रोगराई या आणि अशा अनेक संकटातून मानव बाहेर पडला आहे व यापुढेही पडत राहील. यावर आमची चर्चा थांबली पण पुढे मी या मुद्द्यावर विचार करू लागले आणि ठरवले की आपल्याकडे उपचारासाठी येणाऱ्या काही जोडप्यांची आपण या विषयावर नक्की बोलूयात. ज्यांना मूल होऊ शकत नाही, महागडे इंजेक्शन्स व उपचार घेऊन मुल झाले मध्ये किंवा शस्त्रक्रिया करवून घ्याव्या लागल्या, वेदना सहन करावी लागली अशाही काही जोडप्यांशी मी बोलले. एवढे सगळे सहन करून अपत्य निर्मितीसाठीची त्यांची प्रेरणा शक्ती नेमकी कशाने बरं टिकून राहिली असेल ?
गेल्या काही दिवसात साधारण शंभर जोडप्यांशी याबद्दल चर्चा केल्यानंतर त्यांचे खालीलप्रमाणे अभिप्राय आणि मूल होण्यासाठीची कारणे मला ऐकायला मिळाली….
१. आजवर आम्ही फक्त दोघे होतो आता आम्हाला आमचे स्वतःचे कुटुंब हवे आहे, Family हवी आहे. आता आम्हाला असे वाटते की आमचे दोघांचे एक अपत्य असावे ज्याला आमचा चेहरा, गुणसूत्रे आणि संस्कार असतील . मूल घरात आल्यावर कदाचित आमचे वाद कमी होतील,आम्ही दोघे मुलांसाठी म्हणून अधिक जबाबदारीने वागू
२. आमचे बाळ लहानाचे मोठे होतानाचा आनंद आम्हाला अनुभवायचा आहे . निस्वार्थी प्रेमाचा अनुभव घ्यायचा आहे
३. लग्नानंतर एक-दोन वर्षांनी याबाबत घरी व इतरत्र विचारणा होऊ लागली आहे की पाळणा कधी हलणार तुमच्याकडे ? घरच्या लोकांचे खूपच प्रेशर आहे
४. स्त्री म्हणून मला आई होण्याचा आनंद अनुभवायचा आहे. आता मला त्याशिवाय अपूर्ण वाटतं.
५. आम्हाला एक मुल आहे, त्याला सोबत असावी म्हणून दुसरे मूल व्हावे असे वाटते. आमच्या नंतर त्याला रक्ताचं आपलं कोणीतरी असलं पाहिजे असं वाटतं
६. मला मूल झाले नाही तर पति दुसरे लग्न करेल अशी भीती वाटते. सासू सासरे त्याचे दुसरे लग्न करायला निघाले आहेत
७. नवऱ्याचे संसारात लक्ष नाही, मूल झाल्यावर त्याला बाळाचा लळा लागेल व तो घरी थांबेल
८. मला मूल झाले म्हणजे जगासमोर माझे पुरुषत्व सिद्ध होईल.
९. माझा वंश टिकून राहावा अशी माझी/ माझ्या घरच्यांची इच्छा आहे.
१०. माझ्याकडे असलेल्या वडिलोपार्जित संपत्तीला वारसदार हवा आहे आणि माझे स्वःताचे मूल असेल तरच ह्या संपतीचा हक्क मला मिळेल असे सुद्धा मला एका जोडप्याने सांगितले
११.आम्ही वृद्ध झाल्यावर आमची काळजी घेण्यासाठी कुणीतरी असावं
ही सर्व उत्तरे ऐकून मला लक्षात आले की मूल होणे ही एक मूलभूत जैविक अंतःप्रेरणा तर आहेच पण या विषयाला कितीतरी सामाजिक, आर्थिक व वैयक्तिक पदर आहेत.
एकंदरीतच प्राणीमात्र असोत की मनुष्य, सर्वांनाच संतती, अपत्यप्राप्ती व वंश सातत्य टिकवून ठेवणे जरी आवश्यक वाटत असले तरी हे सर्व करताना आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिची योग्य काळजी घेऊन येणार्या पिढ्यांसाठी ती अधिक रहाण्या-योग्य बनवणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे व ती योग्य रीतीने पार पाडणे हेही आपले कर्तव्य आहे.
आता पुढच्या वेळी मुलाशी चर्चा करतांना त्याला नेमके काय सांगावे हे मला उमगले होते !
कृपया काळजी घ्या सुरक्षित रहा !
– डॉ. वैशाली चौधरी
एम.डी, पीएच.डी.
Some days ago I had an interesting discussion with my son who is 22 years old. I told him how, nowadays I think about the days when I will have a grandchild and to my utter surprise , he said , “ Oh Mamma , Stop Daydreaming. I will never have a child. Why to bring a person in the world when that person has not asked you to bring him /her into this chaotic and messed up planet”.
I was taken aback. “ But every person wants to have a biological child. And For-Your-Information, I have spent 25 years of my career helping couples to have a baby and I have seen couples experiencing ultimate bliss and happiness when they have a baby and Babies are so cute !!. So you must also have one, someday”, I replied
“So , you mean to say that , for my selfish interests and maybe for your selfish interest, I should bring a child and put him into a world that will have so many challenges in the next few years . Look , I am 22 now, so by the time I have a child it will be the year, 2032 or 2034. So when the child becomes 25 years old, it will be the year 2057 or 2058. You think the world will be worth living by then ??Think of the difficulties the child will face. You will not be alive then , but for your selfish interest, you would have put a life into trouble.The population is increasing so much, the environment is getting worse day by day and there is so much hatred and wars in the name of religion , caste and creed.
I thought may be this cynicism has come from watching too many sci-fi movies showing apocalypse happening and the end of the world. But, for sometime I was definitely speechless , though I did try to continue defending my side
But I really thought , lets take an opinion of all the couples who come to me for treatment and find out what is the driving force behind their decision to go ahead with so many treatments and sometimes hardships of taking injections and undergoing surgeries to have a baby . So I asked this question to about 100 of my patients and these were the various answers I came across repeatedly and I am quoting them unedited
Reasons given::
1. We want to have a Family of our own. We have lived as a couple but we want to have something that belongs to both of us, a child which will share our genes , our features, our habits
2.We want to experience unconditional Love which we can have only by having a baby. I want the joy of seeing the baby grow into a beautiful human being
3. Family is putting a lot of pressure , Everyone, everywhere keeps asking this question of why we are not having a baby. It is getting very difficult to be socially acceptable to go on living without a child
4.To prevent the husband from remarrying and to save my marriage is my primary reason to conceive , otherwise I would be okay to stay without a child of my own.This was the explanation given by a few women
5..I want to have somebody to care for us when we become old
6.I will want to give all the Love to the child , all that which I didn’t receive …This was also one reason given by a husband who was of an affluent background, but had a stepmother
7. The husband will not stray and will remain loyal in the marriage due to the responsibility of the baby ( Really ???)
8. I have one child but now I want a second one to give company to my first. There should be someone of his own family even after we have left this world
9. I want to prove my masculinity/feminity by having a baby .I want to prove to the world that I am also capable of bearing a child
10.One elderly couple also gave an explanation that they will able to inherit property only if they have a biological child of their own
The reasons may be varied but all I have understood is that besides being a biological instinct, there are many social , financial and personal reasons to having children..
Whatever the reason maybe , we all should remember to make our Mother Earth a safer place, where we should be able to nurture many more generations to come . I knew that I had my answers ready to prove my point to my son..
Take care and Stay Safe
Dr. Vaishali Chaudhari.
M.D (Obs & Gyn), Ph.D